मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोठार भूमिका घ्यावी-शिवसेना महिला आघाडी

शिवसेना महिला आघाडी हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात येत असून राज्यभरात संतापाचे वातावरण सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील शिवसेना महिला आघाडीच्यावतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या महिलांनी कोर्ट नाका येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पीडित मुलीला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी महिला आघाडी, नगरसेविका आणि शिक्षक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.