आठवडी बाजार ३१ मार्च पर्यंत बंद

ठाणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यामधील ग्रामीण क्षेत्रातील आठवडी बाजार दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. ___ कल्याण तालुक्यातील पिंपरी,गोवेली,म्हारळ , बेहेरे, राया- ओझर्ली, भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा, कोन, खारबाव, पडघा, पाच्छापुर, अनगाव, दाभाड, वज्रेश्वरी, अंबाडी, अस्नोली , मुरबाड तालुक्यातील. सरळगाव,धसई, टोकावडे, म्हसा. शहापूर तालुक्यातील आटगाव, किन्हवली, सापगाव, गोठेघर, पिवळी, मोखावणे- कसारा, शेणवे, अघई, डोळखांब या ठिकाणचे आठवडी बाजार बंद राहतील. । उपरोक्त ठिकाणांशिवाय अन्य ठिकाणी अनौपचारिक स्वरूपात भरणारे छोटया प्रमाणातील बाजार व त्यामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असे आदेश संबधितांना दिले आहेत. ____ या उपरोक्त आदेशाची अवाज्ञा करणारी व्यक्ती अथवा संस्था भारतीय दंडसंहिता १८६० (४५) याच्या कलम १८८ शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.