बेवारस वाहनांवर महापालिका करणार धडक कारवाई

ठाणे: रस्ता वाहतुकीला अडथळा ठरणा-या आणि नो पार्किं ग म ध्ये अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या भंगार अवस्थेतील बेवारस वाहनांवर महापालिकेच्या वतीने धडक कारवाई करण्यात येणार आहे. सदरची कारवाई करताना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात येवून वाहने हटविण्याची मुभा देण्यात येणार असून नोटीस कालावधी संपताच वाहने हटवून अधिनियमातील तरदुती नुसार कारवाई करण्यात येणार आहे. नगर विकास विभागा कडील शासन परिपत्रकान्वये महानगर पालि के च्या हद्दीतील रस्ते, पुल, उड्डाणपुल येथे अनधिकृतपणे सोडून दिलेल्या बेवारस वाहनांमुळे रहदारीस मोठया प्रमाणात अडथळा निर्माण होतो. तसेच कार्यक्षेत्रातील स्वच्छता, सुरक्षितता व अपघात यासारखे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता मोठया प्रमाणात असते. बेवारस वाहनांमुळे रहदारीस मोठया प्रमाणात अडथळा निर्माण होवून अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने अशा वाहनांवर ठोस व काल मर्यादेत कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम व कारवाई करण्या बाबत शासनाने सुचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने महा न ग र पालिका अधिनियमातील तरतूदींन्वये बेवारस वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे सोड़न दिलेल्या बेवारस वाहनांवर कारवाईसाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग क डील परिपत्रकानुसार महाराष्ट्र पोलीस कायदा. २०५१ कलम ८२, महाराष्ट्र मोटर वाहन नियम, १९८९ नियम २२२ व मोटर वाहन कायदा१९८८ कलम १२२ च्या अनुषंगाने विहित करण्यात आलेल्या कार्यपध्दतीनुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, कलम २३०, २३१ व २४३ अन्वये तसेच मुंबई महानगरपालिका अधिनियमांच्या नुसार कार्यवाही करण्यात येईल.