नवी दिल्लीः देशात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या अजूनही वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने आज दुपारी दिलेल्या माहितीत करोनाचे ६९३ नवे रुग्ण आढळल्याचं सांगण्यात आलं. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी नागरिकांना एकजूट होण्याचं आवाहन केलं आहे. करोना व्हायरसविरोधी या लढाईत देशासाठी एकजूट होण्याची ही मोठी संधी आहे. एकजूट होऊनच आपण करोना व्हायरसवर मात करू शकतो. या व्हायरसचा पराभव करणं हेच आपलं लक्ष्य आहे. करुणा, सहानुभूती आणि बलिदान हाच विचार सर्वांच्या केंद्रस्थानी असला पाहिजे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं. त्यांनी ट्विटमध्ये हिंदूमुस्लिम मुलांचा एक फोटोही शेअर केलाय.
करोना, ही एकजूट होण्याची संधीः राहुल गांधी