नाशिक शहरात करोनाचा शिरकाव

 नाशिकः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिरकाव केलेल्या करोना विषाणूने आता नाशिक शहरातही धडक मारली आहे.शहरात एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून शहरवासीयांच्या उंबऱ्यापर्यंत हा विषाणू पोहोचला आहे.त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी अधिकाधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे. जिल्ह्यात २७ एप्रिलला पहिला करोनाबाधित रुग्ण आढळून आला. लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथील हा रुग्ण सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्याची प्रकृती बरी असल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली.